Thursday, November 21, 2024
Homeजुन्नरJunnar : श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सेट परीक्षेत उज्ज्वल यश

Junnar : श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सेट परीक्षेत उज्ज्वल यश

जुन्नर / आनंद कांबळे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार देश व राज्य पातळीवर सहाय्यक प्राध्यापक पदाच्या नियुक्तीसाठी राष्ट्रीय पातळीवर नेट व राज्यस्तरावर सेट परीक्षा घेण्यात येते. या वर्षाची सेट परीक्षा ०७ एप्रिल २०२४ रोजी आयोजित केली गेली होती. सदर परीक्षेमध्ये श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर मधील प्राणीशास्र विभाग व संशोधन केंद्र यामध्ये कार्यरत असलेले भगवान चिमटे, सचिन पिंगळे व सिद्धी हुंडारे यांनी लाईफ सायन्सेस या विषयामधून यश संपादन केले आहे. (Junnar)

जुन्नर (Junnar) तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे, विश्वस्त मंडळ व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. महादेव वाघमारे, या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्राणीशास्र विभाग व संशोधन केंद्रामधील डॉ. प्रमोद माने, डॉ. दिपाली माने, प्रा. गौरव कांबळे, प्रा. कांचन वर्पे, प्रा. वर्षा ढोले, प्रा. वैष्णवी राघतवान, श्री सिद्धेश मेहेर व कु. प्रतीक्षा आगळे यांनीही अभिनंदन केले.

लाईफ सायन्सेस मध्ये वनस्पतीशास्र, प्राणीशास्र, जैवतंत्रज्ञान, अनुवंशिकशास्र, सूक्ष्मजीवशास्र, जैवविविधता, पर्यावरणशास्र आणि उत्क्रांती अशा तेराहून अधिक विषयांचा समावेश होतो. तसेच या परिक्षेचा निकाल हा फक्त सहा टक्के लागतो. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या सहा टक्के विद्यार्थी हे यश संपादन करत असतात. त्यामुळे सदर परीक्षा ही अतिशय अवघड समजली जाते. प्राणीशास्र व संशोधन केंद्रात लाईफ सायन्सेस विषयातून सदर परीक्षेच्या तयारीसाठी लागणारे सर्व प्रकारचे संदर्भग्रंथ, पुस्तके, नोट्स, मार्गदर्शन व सोई-सुविधा उपलब्ध असल्याचे प्राणीशास्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी. चौधरी यांनी सांगितले. (Junnar)

वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांनी प्राणीशास्र विभाग व संशोधन केंद्राचे प्रमुख व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. रविंद्र चौधरी यांचे आभार मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या

बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

संबंधित लेख

लोकप्रिय