Monday, September 16, 2024
Homeजुन्नरJunnar : आई-वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसची वाटप

Junnar : आई-वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसची वाटप

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी जि. प शाळेत माजी सरपंच गजानन हरिभाऊ तांबोळी यांनी आपल्या आई-वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप केले. (Junnar)

आदर्श शिक्षक दत्तात्रय कारभारी वाबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आयकार्डचे वाटप केले. मयूर गजानन तांबोळी यांनी शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे जाहीर केले.

याप्रसंगी गजानन हरिभाऊ तांबोळी माजी सरपंच वडगाव सहानी, हंबीर भिकाजी वाबळे चेअरमन, वडगाव सहानी युवा फाउंडेशनचे मदन दत्तात्रय वाबळे, शैलेश काशिनाथ वाबळे, रमेश महाराज वाबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल ज्ञानेश्वर तांबोळी, उपाध्यक्ष कल्याणी राजेंद्र वाबळे, मयूर गजानन तांबोळी, मोहन गजानन तांबोळी, शमंगेश रामचंद्र वाबळे, जयेश गंगाधर वाबळे, धीरज बाबाजी तांबोळी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Junnar)

याप्रसंगी वडगाव सहानीचे माजी उपसरपंच कै. बाबाजी बन्सी तांबोळी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कु. धीरज बाबाजी तांबोळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र बेलवटे यांनी केले तर सर्वांचे आभार बाळासाहेब बांबळे यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या

बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

संबंधित लेख

लोकप्रिय