Tuesday, September 17, 2024
Homeजुन्नरJunnar : उदापूर येथील विद्यार्थ्याला आर्थिक मदतीचे आवाहन

Junnar : उदापूर येथील विद्यार्थ्याला आर्थिक मदतीचे आवाहन

Junnar / राजेंद्रकुमार शेळके : उदापूर ता.जुन्नर येथील सरस्वती विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकणारा कुणाल आत्माराम बर्डे या विद्यार्थ्याला मार्च २०२४ मध्ये अर्धांगवायूचा झटका आला. त्याला उपचारासाठी डी. वाय. पाटील या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असून उपचार चालू असताना त्याला जी.बी.एस. या गंभीर आजाराचे निदान झाले. तो पूर्ण बेशुद्ध होता. व्हेंटिलेटर आणि इतर महागडी औषधे यांचा खर्च व घरची परिस्थिती नाजूक असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी दानशूर व्यक्तीना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

डॉ. संदेश राऊत यांनी स्वतः जातीने लक्ष घालून देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार ऍग्रो संजीवनी यांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला दोन लाखाची मदत केली. उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश दांगट यांनी त्यांना शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून सात लाखाची मदत मिळवून दिली, तर नारायणगाव येथील प्रसिध्द सर्पदंश तज्ञ डॉ.सदानंद राऊत यांनी १ लाख रु.चे ऑक्सिजनचे मशीनही मोफत दिले आहे. पुढच्या वैद्यकीय उपचारांसाठी आम्हाला मदतीची गरज आहे. (Junnar)

तरी सर्वांनी समाजातील घटकांनी सर्वच घटकांना व दानशूर व्यक्तींना आर्थिक मदत पाठविण्यासाठी श्री.आत्माराम बर्डे, उदापूर, तालुका – जुन्नर, जि.पुणे.यांच्या फोन नंबर ७३५०३९८९७९ या फोनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या

बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

संबंधित लेख

लोकप्रिय