Snake Bite Gondia : गोंदियाच्या फुलचुर येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यात सुनील नागपुरे नावाच्या सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुनील नागपुरे हे सापाला पकडताना त्या सापाने त्यांना दंश केला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
सुनील नागपुरे यांनी एका घरात शिरलेल्या सापाला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते की, सुनील नागपुरे सापाला पकडून गोणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्या प्रक्रियेत सापाला अचानक त्यांना दंश केला.
Snake Bite Gondia
दंशानंतरही, सुनील यांनी धैर्य दाखवत तो सापाला गोणीमध्ये बंद केला. मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. तात्काळ त्यांना गोंदिया शहरातील केटीएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुनील नागपुरे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल
शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद
सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद
दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन