Tuesday, December 3, 2024
Homeआरोग्यAmoeba : मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

Amoeba : मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

कोझिकोड : केरळमधील कोझिकोड येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. 14 वर्षांच्या मृदुल नावाच्या मुलाचा मेंदू खाणाऱ्या अमिबाने (amoeba) जीव घेतला आहे. मृदुल एका छोट्या तलावात आंघोळीसाठी गेला होता, तेव्हा त्याला मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे संसर्ग झाला. हा रोग अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस (पीएएम) म्हणून ओळखला जातो, जो नायगलेरिया फॉवलेरी नावाच्या अमीबामुळे होतो.

नायगलेरिया फॉवलेरी अमिबा (amoeba) पाण्यातून शरीरात प्रवेश करतो आणि अवघ्या चार दिवसांत मानवी मज्जासंस्थेवर हल्ला करतो. त्यामुळे मेंदूला सूज येते आणि 14 दिवसांच्या आत रुग्णाचा मृत्यू होतो. केरळमध्ये या वर्षी या आजाराने झालेला हा तिसरा मृत्यू आहे.

मृदुलच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही देशातील विविध रुग्णालयांमध्ये अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिसच्या प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्र सरकारच्या एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) नुसार, केरळपासून हरियाणा आणि चंदीगडमध्ये आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यापैकी 2021 नंतर सहा मृत्यूंची नोंद झाली आहे.

केरळमध्ये 2016 मध्ये या आजाराचे पहिले प्रकरण समोर आले होते. तेव्हापासून येथे आठ रुग्ण सापडले असून सर्वांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीस्थित इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, 2019 पर्यंत देशात या आजाराची 17 प्रकरणे नोंदवली गेली होती. परंतु कोरोना महामारीनंतर अनेक प्रकारच्या संसर्गामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हा आजार अचानक वाढण्यामागे हे कारण असू शकते.

amoeba

विशेषज्ञांच्या मते, नायगलेरिया फॉवलेरी हा अमिबा गरम पाण्याच्या स्त्रोतांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. तलाव, नदी आणि उघड्या जलाशयांमध्ये आंघोळ करताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या आजाराबाबत जनजागृती करणे आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कोझिकोड येथील या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी जलस्रोतांमध्ये सुरक्षितता पाळण्याचे आवाहन केले जात आहे. प्रशासनाने या अमिबाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांचा पुनरावृत्ती होऊ नये.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी

नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?

गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

संबंधित लेख

लोकप्रिय