पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : भारतात एमएमबीबीएस साठी असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या फी मुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न स्वप्नचं राहते. पण जॉर्जियामध्ये अत्यंत माफक फी मध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन MBBS होण्याचे स्वप्न साकारण्याची संधी उपलब्ध आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी येत्या रविवारी (दि. ७ रोजी) सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. Pune news
जतन फाऊंडेशन, फिनकॉम एज्यु व्हेनचर्स, पॅट्रिक एज्युकेअर यांच्यावतीने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, जतन फाऊंडेशनचे रवींद्र झेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. रविवारी (७ जुलै) सकाळी १० ते १२ या वेळेत नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशन येथे हे सेमिनार होणार आहे.
जर्मनीतील जॉर्जिया मधील कॉकेशस युनिव्हर्सिटी, ईस्ट वेस्ट युनिव्हर्सिटी आणि बैल्स सी या युनिव्हर्सिटी मध्ये उपलब्ध असणाऱ्या एमबीबीएसच्या संधी बाबत सर्व माहिती या सेमिनारमध्ये देण्यात येणार आहे. या युनिव्हर्सिटी मध्ये एमबीबीएसच्या अभ्यासक्रम चार वर्षाचा असून दोन वर्ष इंटर्नशीप असा एकूण सहा वर्षांचा आहे. PUNE
एकुण सहा वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 45 लाखांच्या आसपास खर्च आहे. या फी मध्ये हॉस्टेल, भारतीय जेवण यांचा समावेश आहे. त्याचबरोबर हा अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच जर्मन भाषेचे प्रशिक्षणही देण्यात येते. इथं एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर भारतात वैदयकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या ‘FMG’ या परिक्षेची तयारीही करून घेतली जाते.
तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जर्मनीतील MD या कोर्सला ऍडमिशन मिळू शकते. जर्मनी मध्ये सर्व शिक्षण मोफत असते. या शिवाय जोर्जियमध्ये शिकलेले भारतीय डॉक्टर देखील या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी जॉर्जियामध्ये असणार आहेत. या एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती प्रत्यक्ष विद्यापीठ प्रतिनिधींकडून जाणून घेण्यासाठी जास्तीतजास्त विद्यार्थी आणि पालकांनी या सेमिनारला उपस्थित राहावे, असे आवाहन जतन फाऊंडेशनचे रवींद्र झेंडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
रवींद्र झेंडे
जतन फाउंडेशन,पुणे
मो-9890112868
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली
धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ
ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा
ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा
ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी