पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : उल्हास जगताप यांनी अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली. एक कर्तबगार अधिकारी म्हणून नेहमी त्यांची ओळख राहील यात शंका नाही. त्यांचा अतिरिक्त आयुक्त पदापर्यंतचा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. pcmc
तसेच त्यांनी प्रशासकीय कामकाज करत असताना शहराच्या विकासात दिलेले योगदान अतुलनीय असून महापालिकेस त्यांची उणीव नेहमी जाणवत राहील, असे प्रशंसोद्गार आयुक्त शेखर सिंह यांनी काढले.
अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते. PCMC
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, उल्हास जगताप यांचा फायरमन, सहाय्यक समाजविकास अधिकारी, समाजविकास अधिकारी, नगरसचिव आणि शेवटी अतिरिक्त आयुक्त हा सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास नेहमी अनेकांसाठी प्रेरणादायी राहील. तसेच गेली अनेक वर्षे शहरात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना, विकास कामांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता.
सेवानिवृत्ती नंतरही त्यांनी समाजसेवेचे हे व्रत असेच चालू ठेवावे आणि कुटुंबियांसोबत आनंदाने निरोगी जीवन जगावे, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले. pcmc
अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सेवेत असताना सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच अतिरिक्त आयुक्त या पदापर्यंतचा प्रवास शक्य झाला असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा
ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा
ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद