Tuesday, January 14, 2025
Homeताज्या बातम्याBeed : लोकसभा मतदारसंघात ११ दिव्यांग तर २२ युवा मतदान केंद्र

Beed : लोकसभा मतदारसंघात ११ दिव्यांग तर २२ युवा मतदान केंद्र

Beed : बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा निहाय एकूण 2355 मतदान केंद्र असणार आहेत. यापैकी 11 मतदान केंद्रांवर दिव्यांग तर 22 मतदान केंद्रांवर युवा मतदान अधिकारी कर्मचारी असणार आहेत. (Beed)

भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या प्रक्रियेला अधिक सुरळीत आणि व्यापक करण्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम आखलेल्या आहेत. या अंतर्गत तरुण मतदारांनी मतदान प्रक्रियेचा भाग व्हावा यासाठी युवा मतदान केंद्र उभारलेली आहेत. दिव्यांग नागरिकांनाही मुख्य प्रवाहात आणून त्यांनी मतदान प्रक्रियेचा भाग व्हावा यासाठी दिव्यांग मतदान केंद्र नियोजित केले आहे.

दिव्यांग मतदान केंद्रावर 1 मतदान केंद्र अध्यक्ष, 1 सहाय्यक मतदान केंद्र अध्यक्ष व 2 इतर मतदान अधिकारी असे एकूण 4 दिव्यांग अधिकारी, कर्मचारी असतील. असे प्रत्येक तालुक्यात 01 दिव्यांग मतदान केंद्र आहे. असे एकूण 11 मतदान केंद्र बीड लोकसभा मतदारसंघात आहेत.

तसेच बीड लोकसभा मतदार संघातील एकूण सहा विधानसभा मतदार संघात 22 मतदान केंद्र ही युवा (स्त्री/पुरुष) मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येकी 01 तालुक्यात 02 युवा मतदान केंद्र असणार आहेत. ज्यांचे वय 35 पेक्षा कमी असेल असे नागरिक हे युवा मतदान केंद्र चालवणार आहेत या मतदान केंद्रातही 1 मतदान केंद्र अध्यक्ष, 1 सहाय्यक मतदान केंद्र अध्यक्ष 2 इतर मतदान अधिकारी असे 4 युवा (स्त्री/पुरुष) मतदान अधिकारी कर्मचारी असणार आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक लोकसंख्या अधिक असून यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनात परदानशीन बुथ् उभारण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक बुथवर एक महिला सहाय्यक अधिकारी असणे आवश्यक आहे. याप्रमाणे गेवराई विधानसभा मतदारसंघात 27, माजलगाव विधानसभा मतदार संघात 48, बीड विधानसभा मतदारसंघात 136, आष्टी विधानसभा मतदारसंघात 26, केज (राखीव) विधानसभा मतदारसंघात 39, परळी विधानसभा मतदारसंघात 42 असे एकूण 318 परदानशीन बुथ उभारण्यात आलेले आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघात 397 मतदान केंद्र, माजलगाव विधानसभा मतदारसंघात 379, बीड विधानसभा मतदारसंघात 382, आष्टी विधानसभा मतदारसंघात 440, केज विधानसभा मतदारसंघात 415, परळी विधानसभा मतदारसंघात 342 असे एकूण 2355 मतदान केंद्र बीड लोकसभा मतदारसंघात असणार आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

संबंधित लेख

लोकप्रिय