Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सुंदर स्टेटस ठेवला अन् काही वेळातच भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

Nashik accident : नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. आयशर टेम्पो आणि लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचा समावेश असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण नाशिक हादरून गेले आहे.

---Advertisement---

रात्री आठच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील द्वारका पुलावर हा अपघात घडला. धुळ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला नाशिककडे परतणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकच्या मागील बाजूस बसलेल्या मुलांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्या, ज्यामुळे सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने काही जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याआधीच मृत घोषित करण्यात आले.

या अपघातामुळे द्वारका पुलावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. नाशिक-मुंबई महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी अथक प्रयत्न केले.

---Advertisement---

Nashik accident मृत आणि जखमींची माहिती

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते, चेतन पवार यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये राहुल राठोडे (वय 20), लोकेश निकम (वय 18), अरमान खान (वय 15), ओम काळे, अक्षय गुंजाळ, राहुल साबळे यांचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या अपघातामुळे नाशिक शहरात शोककळा पसरली आहे. मृत आणि जखमींचे कुटुंबीय सिडको येथील सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी असून, या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘सारथी’मार्फत तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार विद्यावेतन मिळणार

ज्येष्ठ गायक अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन

एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर मिळणार

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles