Thursday, February 6, 2025

…अन्यथा लाडकी बहीण योजनेतील त्या महिलांकडून दंड वसूल करण्याचा इशारा

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना अगदी अल्पावधीतच राज्यात लोकप्रिय झाली. या योजनेचा निवडणूकीत महायुती सरकारला देखील चांगला फायदा झाला. मात्र आता राज्याच्या तिजोरीतील कमतरता, वाढता कर्जाचा बोजा आणि योजनेत लाभार्थ्यांची वाढती संख्या यामुळे ही योजनेबाबत उलट सुटल चर्चा सुरू आहे.

महायुती सरकारमधील काही मंत्र्याच्या विधानामुळे योजना बंद होणार का? असा सवाल आता उपस्थित होतो आहे. आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. या योजनेचे निकष पाळले जावेत आणि लाभासाठी अपात्र महिलांना योजनेतून वगळले जावे, अशी भुजबळ यांनी मागणी केली आहे.

भुजबळ म्हणाले की, योजनेअंतर्गत आतापर्यंत दिलेले पैसे परत मागण्यात अर्थ नाही. ते सरकारने महिलांना समर्पित केले आहेत. मात्र, यापुढे निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून आपले नाव योजनेतून काढून टाकावे, अन्यथा अशा महिलांकडून दंड वसूल करण्यात येईल, असे त्यांनी सुचवले.

Ladki Bahin Yojana सुरू राहणार का याबाबत साशंकता

दरम्यान, लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू ठेवायची की बंद करायची, यावरून सध्या मोठे राजकीय वादळ उठले आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता, ही योजना कायम राहील की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

सुंदर स्टेटस ठेवला अन् काही वेळातच भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

‘सारथी’मार्फत तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार विद्यावेतन मिळणार

ज्येष्ठ गायक अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन

एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर मिळणार

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

Related Articles

- Advertisement -

Latest Articles