Sunday, May 19, 2024
Homeग्रामीण५ सप्टेंबर : केंद्र सरकारच्या श्रमिकविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांच्या विरोधात दिल्लीत तीव्र...

५ सप्टेंबर : केंद्र सरकारच्या श्रमिकविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांच्या विरोधात दिल्लीत तीव्र निदर्शन.

दिल्ली : केंद्र सरकारच्या श्रमिकविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांच्या विरोधात सेंटर ऑफ ट्रेड युनियन (सिटू), अखिल भारतीय किसान सभा,  शेतमजूर युनियन यांच्या वतीने दिल्लीतील कॉम्रेड बी. टी. रणदिवे भवनासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

कोविड – १९ टेस्ट ची मोफत व्यवस्था करा, रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करा, गरजूंना मोफत रेशन द्या, रोजगार व उत्पन्न बुडालेल्या दरमहा बारा हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या, मनरेगा मार्फत सर्वांना काम द्या, किमान वेतन सहाशे रुपये प्रतिदिन करा, बेरोजगारांना दहा हजार रुपये दरमहा बेरोजगार भत्ता द्या, शेतकरी विरोधी चारही अद्यादेश मागे घ्या, कामगार विरोधी लेबर कोड रद्द करा,फिक्स्ड टर्म रोजगार बाबतचा निर्णय रद्द करा, वेतन कपात- कामगार कापतीवर बंदी घाला, सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण / विक्री रद्द करा, नवे शैक्षणिक धोरण मागे घ्या, वीज बिल दुरुस्ती २०२० मागे घ्या, लोकडाऊन काळातील विजबिल माफ करा, यंत्रमाग, ऊसतोड, हॉकर्स, रिक्षाचालक- वाहन चालक यांचेसह असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना कल्याणकारी योजना लागू करा, आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच गौरी लंकेश यांच्या तिसऱ्या हौतात्म्य दिनी धर्मांध शक्तींचाही निषेध करण्यात आला. 

यावेळी  सिटूच्या राष्ट्रीय अध्यक्षा के. हेमलता, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय सहसचिव विक्रम सिंह यांनी संबोधित केले. 

यावेळी सीटूचे केंद्रीय नेते ज्ञान मजुमदार, ए. आर. सिंधू, अमिताव गुहा, किसान सभेचे केंद्रीय नेते विजू कृष्णन, पी. कृष्ण प्रसाद आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय