Thursday, November 21, 2024
Homeआंतरराष्ट्रीयBangladesh : बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

Bangladesh : बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

Bangladesh : बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवामी लीग पार्टीच्या नेत्याच्या मालकीच्या फाईव्ह स्टार झबीर इंटरनॅशनल हॉटेलला दंगेखोरांनी आग लावली. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जोशोर जिल्ह्यातील या हॉटेलला आग लागली. या भीषण आगीत २५ नागरिकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एक इंडोनेशियाचा नागरिक देखील आहे.

हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून काही मृतदेह सापडले आहेत. जोशोर जनरल हॉस्पिटलमधील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पार्थो चक्रवर्ती यांनी सांगितले की, “आग लागल्यामुळे १५० पेक्षा जास्त जण रुग्णालयात दाखल झाले आहेत.” (Bangladesh)

झबीर इंटरनॅशनल हॉटेल हे सध्याच्या अवामी लीग सरकारमधील खासदार शाहीन चकलदार यांच्या मालकीचे असून, ते बांगलादेशातील नैऋत्य भागातील जोशोर जिल्ह्यात स्थित आहे. 

शेख हसीनाच्या देश सोडल्याच्या बातमीनंतर ढाका आणि इतर भागांमध्येही हिंसाचाराची लाट उसळली. यामध्ये सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आणि हसीनाच्या सरकारी निवासात घुसून आतले सामान लुटले आहे. (Bangladesh)

या घटनेमुळे बांगलादेशातील परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण बनली असून, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद

सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद

दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन

संबंधित लेख

लोकप्रिय