Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडज्येष्ठ नागरिक त्रिवेणीनगर संघाचा 14 वा वर्धापन दिन संपन्न

ज्येष्ठ नागरिक त्रिवेणीनगर संघाचा 14 वा वर्धापन दिन संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : तळवडे, त्रिवेणीनगर येथील जेष्ठ नागरिक संघाचा 14 वा वर्धापन दिन 24 जून 2023 रोजी साजरा करण्यात आला. तळवडे, रूपीनगर, त्रिवेणीनगर, म्हेत्रेवस्ती, मोरेवस्ती, कृष्णानगर, यमुनानगर संभाजीनगर या ज्येष्ठ नागरिक संघाची उपस्थिती केली, निवृत्तीनंतर बहुसंख्य कामगार एकाकी जीवन जगत असतात. कंपनीतील सहकारी दूर झालेले असतात, अशा वेळी नवे मित्र, सवंगडी मिळावेत व उर्वरित आयुष्यातील वेळ समाधानी व आनंदी व्हावे,एकमेकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात, यासाठी जेष्ठ नागरिक संघाची त्रिवेणीनगर येथे स्थापना 2010 साली केली, असे अध्यक्ष सर्जेराव पोळ यांनी सांगितले.

दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा वह्यांचा संच देऊन गुणगौरव करून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान केला गेला. यावेळी जून महिन्यात वाढदिवस असलेल्या व वय 80 वर्षे पुढे असलेल्या जेष्ठ नागरिकांचा श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दहावी, बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.



आमदार महेश लांडगे यांनी शुभेछा संदेश पाठवून जेष्ठांचे कौतुक केले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक शांताराम भालेकर,माजी नगरसेवक पंकज भालेकर, महासंघाचे सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी, अध्यक्ष प्रभाकर कोळी, सचिव हरिनारायण शेळके, सामाजिक कार्यकर्ते शांताराम दगडू भालेकर, अरुणाताई भालेकर, नरेंद्र भालेकर, हनुमंत कलमोरगे, गणेश भालेकर, रावसाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी 30 महिला, 70 पुरुष तसेच विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ-म्हेत्रे वस्ती, कृष्णा नगर, सचिन ज्येष्ठ नागरी संघ, यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघ, रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघ, घार्जाई माता रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व संघांचे पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ढमाले सर व सुभाष सर यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले. अध्यक्षीय भाषण व आभार प्रदर्शन संघाचे अध्यक्ष सर्जेराव पोळ यांनी केले.

Rainy season : पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व २०२३-२०२४ च्या अध्यक्षपदी आण्णासाहेब कसबे यांची निवड जाहीर

PCMC Video: चिखली कुदळवाडी मोई रस्ता पहिल्या पावसात रस्त्याची चाळण,धोकादायक खड्डे तातडीने बुजवा

संबंधित लेख

लोकप्रिय