Friday, May 3, 2024
HomeकृषीRainy season : पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे

Rainy season : पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्जन्यवृष्टी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: दशकातील अतिउष्ण वैशाख वणव्याने सलग तीन महिने हैराण झालेल्या देशवासियांना पावसाने दिलासा दिला आहे. बीपरजॉय चक्रीवादळामूळे लांबलेल्या मान्सूनने मुंबई किनारपट्टीला २४ जूनला धडक मारली, मुंबई, ठाणे, नाशिक, रायगड, मावळ, पिंपरी चिंचवड, पुणे असा प्रवास करत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १७६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. डहाणू, तलासरी, पालघरसह अंबरनाथ, बदलापूल, उल्हासनगरात धुवाँधार भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे भात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीच संकट टळले आहे. सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह विविध जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.

मुसळधार आणि कोसळधार


हवामान विभागाने आज मान्सूनने महाराष्ट्र व्यापल्याची माहिती दिली.पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे की, महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पुढच्या ५ दिवसांत मान्सून सक्रिय होणार आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर वाढणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.


पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने

जीवनाच्या धावपळीत घामाघूम होऊन अतिउष्ण तापमानाचे चटके सहन केल्यामुळे आपण थकून जातो तेव्हा हा पहिला पाऊस आनंद देत आहे. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्याने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाने आता खरिपाच्या पेरण्यांसाठी सुरवात केली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदले. बारामती, इंदापूर, भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, दौंड या तालुक्यांत सायंकाळच्या सुमाराला चांगला पाऊस झाला. पिंपरी चिंचवड,पुणे चाकण औद्योगिक शहरात पावसामुळे आनंदी आनंद झाला आहे, संभाव्य पाणी कपात टळणार आहे.

विधवा महिलांना तुच्छतेची वागणूक नको, त्यांनाही मानाचा दर्जा मिळाला पाहिजे – सीता केंद्रे

विशेष लेख : जीन्स पँटची निर्मिती कशी झाली व त्यामुळे कोणते तोटे झाले ?

PCMC : जागरूक नागरिकांनी 82 दिवसात मनपाच्या तिजोरीत 300 कोटी जमा केले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय