Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडधम्म ज्योती बुद्ध विहार तांदुळवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती...

धम्म ज्योती बुद्ध विहार तांदुळवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

तांदूळवाडी (क्रांतिवीर रत्नदीप) : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तर्फे धम्म ज्योती बुद्ध विहार तांदुळवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी बारामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे , बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, एडवोकेट योगेश सरोदे ,समीर चव्हाण माजी सभापती बारामती नगरपरिषद ,जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुरज सरोदे, तेजस सरोदे, आप्पा निकाळजे, बाळासाहेब गारडी व इतर भीम अनुयायी मोठ्या संख्येने बुद्ध विहारात वंदनेसाठी उपस्थित होते.



माननीय राहुल घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक व बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय महेश रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली .त्यानंतर राहुल घुगे व महेश रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थितांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रास्तावना, मनोगत आणि सूत्रसंचालन एडवोकेट योगेश सरोदे यांनी केले.



तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कल्याणी नगर तांदुळवाडी येथेही बाबासाहेबांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम पार पडला .त्यावेळी सोनू शिंदे ,विजय कांबळे व इतर आयोजकही उपस्थित होते. अशा प्रकारे तांदुळवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव मोठ्या आनंदात पार पडला.



सायंकाळी ७ वाजता भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये संविधानाच्या पुस्तकांमध्ये बाबासाहेब असा रथ सजवण्यात आला होता.धम्मा बांधवांनी शिस्तीत रांगा करून डीजेच्या तालावर भिमगिते लावत उत्साहात तांदूळवाडी गावामध्ये नगर प्रदक्षिणा घातली .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी तांदुळवाडी गाव दणाणून सोडले. धम्म ज्योती बुद्ध विहार परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा निळे झेंडे लावून वातावरण भीममय करण्यात आले होते.

आकाशात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी शेकडो भीमसैनिक तांदुळवाडी ,कल्याणी नगर आणि आजूबाजूच्या गावातून आले होते.तांदुळवाडी परिसरातील स्त्री-पुरुषांनी एकत्र नृत्य सादर करत समतेचा संदेश दिला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित लेख

लोकप्रिय