Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात १०३ कोरोना पॉझिटिव्ह, तर ७ जणांचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात १०३ कोरोना पॉझिटिव्ह, तर ७ जणांचा मृत्यू

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागणीला २४ तासाच्या रिपोर्टनुसार १०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वेगाने होत असल्याचे दिसून येते.

मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार कुमशेत १४, डिंगोरे ७, पिंपरी पेंढार ६, शिरोली बु. ६, बारव ५, निमगिरी ५, पिंपळवंडी ५, सोमतवाडी ४, आंबोली ३, धोलवड ३, डुंबरवाडी ३, ओतूर ३, सांगनोरे २, उंब्रज २, कोल्हेवाडी २, केळी १, कुकडेश्वर १, वैष्णवधाम १, पारुंडे १, गोद्रे १, हडसर १, घंगाळदरे १, कोपरे १, तळेरान १, ओझर १, खामुंडी १, आंबेगव्हाण १, ठिकेकरवाडी १, नेतवड १, कांदळी १, राजूरी १, आगार १, खिल्लारवाडी १, सावरगांव १, शिरोली बु. १, पिंपळगांव सिध्दनाथ १, वडगांव साहनी १, जुन्नर नगरपरिषद १० यांचा समावेश आहे.

तर तालुक्यातील ६ पुरुष व १ स्रियांचा कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस मृत्यूदरात वाढ होताना दिसत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय