Thursday, May 9, 2024
Homeआरोग्यतुम्ही पॅरासिटामॉल घेताय.. ओव्हर डोस झाल्यावर होईल "हा" अवयव निकामी

तुम्ही पॅरासिटामॉल घेताय.. ओव्हर डोस झाल्यावर होईल “हा” अवयव निकामी

पेनकिलर म्हणून वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉल औषधांच्या बाबतीत एडिनबर्ग युनिव्हर्सिटीने केलेल्या अलीकडील अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. पेनकिलर पॅरासिटामॉल औषधांची अधिक मात्रा सातत्याने घेत राहिल्यास त्याचे आरोग्यावर धोकादायक परिणाम (Overdosage Toxicity) होतात. इतकेच नव्हे तर शरीरातील अवयव निकामी होण्याचा धोकाही संभवतो, असे या अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे पॅरासिटामॉल ओव्हरडोस (Paracetamol Overdose) टाळणे केव्हाही चांगले, असा हा अभ्यास सूचवतो. एडिनबर्ग विद्यापीठाच्या अभ्यासात पॅरासिटामॉल सेवन केल्यानंतर त्याचा शारीरिक अवयवांवर होणारा परिणाम तपासण्यात आला. त्यासाठी संशोधकांनी उंदरावर काही प्रयोग केले आणि पॅरासिटामॉल औषधांचा यकृतावर आणि त्यांच्या पेशींवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. निष्कर्षामध्ये जाणवले की, यकृताला मोठ्या प्रमाणावर धोका आणि काही प्रकरणांमध्ये ते कायमचे निकामी होते.


औषधांच्या अतिसेवनामुळे यकृताच्या कार्यात अडथळा

एडिनबर्ग विद्यापीठाच्या अभ्यासात पॅरासिटामॉलचे यकृताच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समोर आले आहेत. पॅरासिटामॉल हे एक सामान्य वेदनाशामक औषध आहे, जे जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अभ्यासातील प्रमुख निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, पॅरासिटामॉल यकृताच्या पेशींच्या संरचनेच्या अखंडतेमध्ये व्यत्यय आणते. ज्यामुळे यकृतामधील निरोगी कार्यासाठी जबाबदार असलेल्या महत्त्वाच्या पेशींच्या निर्मितीमध्ये आणि कार्यात अडथळा आणू शकते. हा व्यत्यय, अडथळा यकृताचे कार्य बिघडवू शकतो आणि संभाव्यतः पेशींच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. ज्यामुळे सोरायसीस, हिपॅटायटीस आणि यकृताच्या कर्करोगासारखा आजार संभवतो.मोठी बातमी : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

पाश्चात्य जगामध्ये पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस हे यकृत निकामी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. स्कॉटिश नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिससह एडिनबर्ग आणि ओस्लो विद्यापीठातील संशोधकांचा समावेश असलेला हा संयुक्त अभ्यास जटिल वैद्यकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन अधोरेखित करतो. या महत्त्वपूर्ण संशोधन उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्य शास्त्रज्ञ कार्यालय आणि जैवतंत्रज्ञान आणि जैविक विज्ञान संशोधन परिषद यांचे आर्थिक सहाय्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. दरम्यान, हा अभ्यास मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याची भावना जगभरातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय