Monday, May 20, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

मोठी बातमी : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

नवी दिल्ली : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या संदर्भात एक मोठी बातमी येत आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) गुरुवारी, 22 फेब्रुवारी 2024 रोजी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापा टाकल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टमध्ये कथित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआय सर्च ऑपरेशन करत आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या कार्यकाळात किश्तवाडमधील जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित दोन फायली निकाली काढण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच ऑफर केली होती, असा आरोप मलिक यांनी केला होता. सत्यपाल मलिक हे 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते.

सीबीआयच्या या छाप्याबाबत माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सोशल मीडिया साइट X वरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. मलिक यांनी म्हटले आहे. मी गेल्या ३-४ दिवसांपासून आजारी आहे आणि रुग्णालयात दाखल आहे. असे असतानाही सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर हुकूमशहाकडून छापे टाकले जात आहेत. माझा ड्रायव्हर आणि माझा सहाय्यक यांच्यावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांसोबत आहे.

फाईल मंजूर करण्यासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी सीबीआयने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष नवीनकुमार चौधरी, माजी अधिकारी एम.एस. बाबू, एमके मित्तल आणि अरुणकुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सीबीआयने एकूण ३० ठिकाणी छापे टाकले आहेत.

दरम्यान, सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिक म्हणाले की 2019 ची लोकसभा निवडणूक जवानांच्या मृतदेहांवर लढली गेली होती आणि या प्रकरणाची चौकशी झाली असती तर तत्कालीन गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता. या घटनेनंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना तत्काळ माहिती दिली होती, मात्र पंतप्रधानांनी त्यांना गप्प राहण्यास सांगितले होते, असा आरोप मलिक यांनी केला. यासह अनेक आरोप केलेले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय