Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडहडपसर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा

हडपसर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा

पुणे : हडपसर ससाणे नगर, येथे सावली फाऊंडेशन सभागृहात, 9 ऑगस्ट 2022 रोजीज जागतिक आदिवासी दिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हडपसर विधानसभेचे आमदार चेतन पाटील व स्वीकृत माजी नगरसेवक संजय शिंदे, युवा नेते सतीश जगताप तसेच सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, जननायक बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

आदिवासी संस्कृती जल जंगल जमीन यावर आधारलेली असल्यामुळे मान्यवरांना वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार चेतन तुपे, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदिवासी क्रांतिकारक व त्यांचे कार्य याविषयी माहिती दिली. आदिवासी संस्कृती ही मूळची संस्कृती असून या देशाचे ते मूळ मालक आहेत असे आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले. आदिवासी समाजातील असणारे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मी स्वतः पुढे येईल असे आश्वासन देऊन आज महाराष्ट्रमध्ये एकूण 46 जमाती आहेत. देशामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जमाती असून या सर्वांनी एकत्र येऊन आपली संस्कृती जपावी असे मत त्यांनी व्यक्त केले.


9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून शासकीय सुट्टी मिळावी यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पण निवेदन देऊन व चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. कुंडलिक केदारी यांनी आदिवासी समाजातील मुलं आणि मुलींनी त्यांच्याकडे कला आहे त्यांनी कलेमध्ये आपलं नैपुण्य प्राप्त करावे. तसेच त्यांनी काढलेल्या चित्रपट, शॉर्ट फिल्म, पेसा कायदा, पाचवी अनुसूची या विषयी आपले मत व्यक्त केले. आदिवासी संस्कृती परंपरा या विषयी मत व्यक्त केले.

प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी सर्वांनी आदिवासी संस्कृती जपावी, एकीची भावना असावी, जास्तीीत जास्त शिक्षण घ्यावे, जल जमीन जंगल ही संपत्ती जपावी. यावेळी प्रल्हाद सिडाम, मारुती सांगडे, प्रकाश सूर्यवंशी, महेंद्र भोये, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याा. मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आलेे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आदिवासी गायक शरद टिपे यांचे संगीतमय मंत्रमुग्ध करणारा आदिवासी गीतांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांमध्ये सर्व समाज बांधव महिला भगिनी यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. हा कार्यक्रम आदिवासी उत्सव समिती पूर्व पुणे व आदिवासी युवा मंच हडपसर यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अनिल तिटकारे, पुनाजी दिवटे, अजय आत्रम, पंढरी वरखडे, कैलास सरोदे, मधुकर सातपुते, उल्हास बोऱ्हाडे, मधुकर सातपुते, अविनाश मुंडे, विजय गंभीरे, सिंधू गारे, गणपत ठोकळ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना एस. एम. गवारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी मोरमारे यांनी केले, कार्यक्रमाचे आभार दाभाडे यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय