Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदीत जागतिक टपाल सेवा दिन साजरा; सेवारत अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार 

आळंदीत जागतिक टपाल सेवा दिन साजरा; सेवारत अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार 

आळंदी : येथील शिवसेना आळंदी शहर आणि श्री आळंदी धाम सेवा समितीच्या वतीने डाकघर (पोस्ट) कार्यालयात सोमवारी (दि.९) वर्ल्ड पोस्ट डे अर्थात जागतिक टपाल सेवा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. World Postal Services Day celebrated in Alandi 

आळंदीतील डाक घर कार्यालयात टपाल सेवा दिनी आळंदी उप डाकपाल पूनम पाटील, पोस्टल असिस्टंट अंकुश नरवडे, चेतन जाधव, सायली स्वामी, अनिराज मेदनकर यांचा शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी अधिकारी कर्मचारी यांना पेन, डायरी, बुके, गुलाब पुष्प देऊन श्री आळंदी धाम सेवा समितीच्या वतीने सर्व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी शेतकरी बचाव आंदोलन उपाध्यक्ष बाळासाहेब पेटकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, विश्वस्त ज्ञानेश्वर घुंडरे, महादेव पाखरे, राजेश्वर पामपटवार आदी उपस्थित होते. 

टपाल सेवेने गावांपासून शहरांपर्यंत सर्व भू प्रदेशांना एकमेकांशी जोडले आहे. यात अनेक जिल्हे, राज्य, देश टपाल सेवेत जोडले आहेत. ही टपाल सेवा माहिती, संदेश देवाण घेवाण करण्यासाठी फार जुनी आणि सुरक्षित तसेच विश्वासार्ह सेवा म्हणून ओळखली जाते.

जगात टेलिफोन, मोबाईल सेवा सुरु होण्या पूर्वी पासून टपाल सेवा सर्वत्र अस्तित्वात आहे. इतिहास देखील टपाल सेवेचा खूप मोठा आहे. यात पिनकोड क्रमांकांचा समावेश झाल्याने पत्त्यांची अचूकता आली. टपाल सेवा अधिक प्रभावी रित्या कार्यरत असल्याने आळंदीतील टपाल अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आल्याचे श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी सांगितले. अनेक संस्था अधिकृत पत्रव्यवहार करण्यास टपाल सेवेचा वापर करीत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय