Saturday, April 27, 2024
Homeजिल्हाआशा सेविकांचे काम बंद आंदोलन यशस्वी

आशा सेविकांचे काम बंद आंदोलन यशस्वी

जालना : राज्य सरकारचे वाढीव मानधन हे मागील एक वर्षांपासून थकीत होते. मानधनाचा निधी एप्रिल महिन्यात येऊनही, आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे अद्याप वाटप झाला नव्हता. म्हणून आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. 18 जुलै 2022 पासून कामावर बहिष्कार टाकत जिल्हाभर प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयापुढे सत्याग्रह आंदोलन केले. तब्बल 11 दिवसांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या आंदोलनाची अखेर दखल घेतली, असल्याची माहिती आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटना (महाराष्ट्र) अध्यक्ष गोविंद आर्दड यांनी दिली.

दि. 28 जुलै 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संघटनेचे शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशा च्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आशा सेविकांचे आठ कोटी नव्यान्नव लाख अठरा हजार चारशे रुपये प्राप्त निधी आशा च्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे लेखी पत्र संघटनेला देण्यात आले. दोन दिवसात खात्यावर निधी वर्ग होईल. तसेच ज्यांच्यामुळे ही दिरंगाई झाली त्यांना नोटीस पाठवून यापुढे दिरंगाई होणार नाही अशा सक्त नोटीस काढण्यात येतील. इथून पुढे दरमहा नियमित आशा ना मानधन मिळेल याची खबरदारी घेण्यात येईल. राज्य सरकारकडून येणे बाकी असलेल्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडलास दिले.

आशा ना विनामोबदला कोणत्याही कामासाठी दबाव टाकू नये, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दरमहा एकाच मिटिंगला बोलवणे, एम पी डब्ल्यू व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांची कामे आशांना सांगू नये किंवा आशांनीही ते करू नयेत, आशा सूचना प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर देण्यात येतील. कोव्हिड लसीकरणाच्या निधी मिळताच खात्यावर वर्ग करू, कुष्ठरोग क्षय रोग सर्व्हेच्या थकीत निधी लवकरच वाटप करण्यात येईल. इत्यादी मागण्या आरोग्य अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा करत त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

बहुतांश मागण्या मान्य झाल्याने तूर्तास काम बंद आंदोलन संघटनेच्या वतीने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, DAM, DCM, यांची उपस्थिती होती तर संघटनेच्या शिष्टमंडळात अध्यक्ष गोविंद आर्दड, सचिव मीना भोसले, कोषाध्यक्ष कल्पना आर्द्ड, उपाध्यक्ष मंदाकिनी तीनगोटे, पुष्पा सदावर्ते, अनिता कवडे यांची उपस्थीती होती. थकीत मानधन मिळाल्याने शेवटी आशा सेविकांनी समाधान व्यक्त केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय