महाराष्ट्र जनभूमी ऑनलाईन : विशेषत : पुरूषांमध्ये महिला कोणत्या कारणामुळे आकर्षित होतात याबद्दल अनेकदा चर्चा होत असतात. आपल्या व्यक्तिमत कसे आहे हे आपल्या वागण्या बोलण्यातून जाणवत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आणि वागणं खरंतर महिलांना आकर्षक करत असतं.
1. एकमेकांकडे लक्ष देणे : महिलांना आकर्षित करण्यासाठी अनेक पुरुष खूप प्रयत्न करताना दिसतात; पण काहीजण मात्र अजिबात असे प्रयत्न करत नाहीत. हीच गोष्ट महिलांना अत्यंत आकर्षित करते. जे पुरुष सुरुवातीला अजिबात लक्ष देत नाहीत किंवा अगदी कमी लक्ष देतात त्यांच्याकडे महिला जास्त आकर्षित होतात.
2. ड्रेसिंग स्टाईल : पुरुषांच्या ड्रेसिंग स्टाईलकडे महिलांचं लक्ष पटकन वेधलं जातं. फॉर्मल कपड्यांमध्ये असलेल्या पुरुषांकडे बघून त्यांचं गांभीर्य, ताकद आणि त्याच्या अधिकाराबद्दल अगदी लगेचच समजतं. त्यामुळे पुरुषांच्या ड्रेसिंग स्टाईलचाही महिलांवर खूप मोठा परिणाम होतो.
3. भेदक नजर : भेदक नजरेनं बघणाऱ्या पुरुषांच्या भावना त्यांच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसतात. हे पुरुष अत्यंत आकर्षक दिसतात असं महिलांना वाटतं. अशा प्रकारचा इंटेन्स आय कॉन्टॅक्ट म्हणजे नजर अत्यंत आकर्षक असते. दोन व्यक्तींची नजर एकमेकांना भिडते तेव्हा प्रेम वाढतं असं शास्त्रज्ञांचंही म्हणणं आहे. त्यामुळे असे लूक्स देणाऱ्या पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात यात नवल नाही.
4. गंमतीशीर स्वभाव : गंमतीशीर स्वभाव किंवा जोक्स करणारे पुरुष महिलांना आवडतात. त्यांच्या मस्त मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांचं कूल व्यक्तिमत्व समोर येतं. अशा पुरुषांच्या सान्निध्यात महिला स्वत:ला सुरक्षित समजतात. महिलांना ज्या व्यक्ती हसवतात त्यांच्यावर महिला जास्त प्रेम करतात असं रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे.
जाणून घ्या ! रोज सेक्स करण्याचे हे आहेत 9 फायदे
Kiss : चुंबनाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर
आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा
विशेष लेख : चला तर समजून घेऊ – मासिक पाळी
मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत