Sunday, May 19, 2024
Homeराज्यएक दिवस आड पाणी पुरवठ्याची घोषणा मागे घ्या - अश्विनीताई जाधव

एक दिवस आड पाणी पुरवठ्याची घोषणा मागे घ्या – अश्विनीताई जाधव

पिंपरी चिचवड एक दिवस आड पाणी पुरवठ्याची घोषणा मागे घ्या, मागणीला घेऊन महिला नगरसेविका संतप्त झाल्या असून नगरसेविका अश्विनीताई जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पाणी पुरेसे आहे, पुरवठ्याचे व्यवस्थापन बिघडले आहे. शहरातील विस्कळीत असलेला आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याला प्रशासनाच्या गलथान कारभार जबाबदार आहे, यावर्षी चांगला पाऊस पडलेला आहे, धरण भरलेले आहे. मात्र एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याची आयुक्तांची भूमिका मान्य नाही. उन्हाळा सुरु आहे, नागरिकांना सकाळ संध्याकाळ पुरेसे पाणी पुरवण्यासाठी तसेच २४ तास पाणी हे धोरण प्रशासनाने जाहीर करून त्यासाठी कोट्यावधींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

वार्डात सोसायट्याना पुरेशा दाबाने पाणी येत नाही, त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी प्राधान्याने दिले पाहिजे, तो नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. अधी पाणी पिण्यासाठी नंतर इतर कारणासाठी हे तत्व लक्षात घेऊन एक दिवस आड पाणी पुरवठ्याची घोषणा मागे घ्यावी आणि दररोज पुरेसा पाणी पुरवठा करावा, अशी मागणी अश्विनीताई जाधव यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय