Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडखासदार अमोल कोल्हे यांचे लवकरच या अभिनेत्री सोबत लग्न होणार ? चर्चेला...

खासदार अमोल कोल्हे यांचे लवकरच या अभिनेत्री सोबत लग्न होणार ? चर्चेला उधान

पुणे : खासदार अमोल कोल्हे हे नेहमीच वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत असतात. अमोल कोल्हे हे सोशल मीडियावरही चांगलेच अॅक्टीव्ह असतात. आता पुन्हा त्यांनी केलेल्या एका सोशल मीडियावरील पोस्ट मुळे चर्चेत आले आहे.

अमोल कोल्हे यांनी बातमीचे कात्रण असलेली एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या बातमीतील कात्रणात खासदार अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे लवकरच लग्न होणार असल्याचं या बातमीमध्ये लिहिलेलं आहे. अमोल कोल्हे यांच्या या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेंना उधान आलं आहे.

या पोस्ट सोबतच अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं ? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती !’ या पोस्टवर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट केली आहे. अमृता खानविलकरने ‘हे काय आहे’, अशी कमेंट केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय