Saturday, May 4, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषकविता: प्रेमाचा पुरावा

कविता: प्रेमाचा पुरावा

नभाच्या चांदण्यामध्ये
शोधतो आज ही मी तुला ,
उराशी उशी घेऊनी स्वप्नात
भास होतात तुझेच मला.//१//

छळतात मला तुझ्या आठवणी
का? पुन्हा पुन्हा हरवतो त्या किनारी,
नकोच मला वचन शब्दा पुरते
खोटे वागणे तुझे बनवते मला भिकारी.//२//

जगु पाहतो मी नव्या वळणावरती
नकोच म्हणतो मी मागच्या पावलांवरती,
चुकून पाहिले मी आज नभाकडे
त्याने सुद्धा मीठ चोळले जखमांवरती.//३//

तू झालीस सुखी तुझ्या संसारात
मंग का ? आठवते मला कवितेच्या पानावरती,
चोरून चोरून रोज पहात होतो तुला
जेव्हा तू पाणी भरत असताना नळावरती.//४//

थांबव म्हणतो मी हा खेळ भातुकलीचा
सुरू केला होता तु एका शब्दावरती,
नाही आठवत का? आज तुला तो शब्द
मग मलाच का? आठवतो प्रत्येक पावलावरती.//५//

मी शोधले आज माझ्यातचं माझ सुख
नाही आठवत आज आपल्या प्रेमाचा दुरावा,
का? मी झुरतो पुन्हा पुन्हा तुझ्यात
पुसून टाकतो हा आपल्या प्रेमाचा पुरावा.//६//

कवी:योगेश बोऱ्हाडे
मु. पो. देवाळे जुन्नर पुणे 9834516144

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय