Sunday, December 8, 2024
Homeराज्यक्रिकेट विश्वावर शोककळा : दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं निधन

क्रिकेट विश्वावर शोककळा : दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं निधन

मुंबई : क्रिकेट विश्वातून एका दिग्गज खेळाडूच्या निधनाची बातमी समोर येत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी (Salim Durani) यांचं निधन झालं आहे. यांच्या निधनाने भारतीयांवर शोककळा पसरली आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू, सिक्सर किंग सलीम दुर्रानी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज गुजरातच्या (Gujarat) जामनगरमध्ये त्यांचे निधन झाले आहे. सलीम दुर्राणी यांनी भारतीय संघासाठी, एकूण 29 कसोटी सामने खेळले आणि त्यात 1202 धावा केल्या. या 1202 धावांमध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या आहेत. 1960 मध्ये त्यांना क्रीडा जगतातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सलीम दुर्रानी यांचा जन्म अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे 11 डिसेंबर 1934 रोजी झाला. काही काळानंतर दुर्रानी कुटुंब पाकिस्तानातील कराची येथे गेले आणि तिथेच स्थायिक झाले. मात्र, भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर दुर्रानी कुटुंब भारतात आले. त्यानंतर सलीम भारतातच लहानाचे मोठे झाले.

दुर्राणी हे दीर्घकाळ आजारी होते. त्यांची कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज सुरु होती. अखेर आज यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

संबंधित लेख

लोकप्रिय