Lawrence Bishnoi : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आणि सलमान खानला मिळालेल्या धमक्यांमुळे चर्चेत असलेला लॉरेन्स बिश्नोई आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. बिश्नोईला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाग घेण्याची थेट ऑफर देण्यात आली आहे. बाबा सिद्धी यांच्या हत्येनंतर वांद्रे पूर्व विधानसभा मधून आमदार झिशान सिद्दीकी विरोधात लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला थेट ऑफर आली आहे.
बाबा सिद्दिकी यांनी अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथील एका प्रकल्पातील तब्बल 623 गरीब लोकांना बेघर केल्याचा आरोप पंडित सुनील शुक्ला यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात कोर्टात री पिटीशन सुद्धा दाखल केली आहे.परंतु आता लॉरेन्स बिश्नोईला विधानसभेची ऑफर देणारा उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोईला पत्र लिहून निवडणूक लढण्याची मागणी केली आहे. शुक्ला यांनी बिश्नोईला देशभक्त असल्याचे संबोधले आहे आणि शहीद भगत सिंगसोबत त्याची तुलना केली आहे. त्यांच्या मते, लॉरेन्स बिश्नोई उत्तर भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व करू शकतो आणि विधानसभेत त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईने निवडणूक लढवण्यासंदर्भात विचार करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा हात असल्याचे तपासातून उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणात बिश्नोईच्या काही शूटरना अटकही केली आहे. शिवाय, सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या सगळ्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय विकास सेनेने विधानसभेची ऑफर देणं म्हणजे मोठी राजकीय उलथापालथ मानली जात आहे.
उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष निवडणूक आयोगात नोंदणीकृत असून, त्यांनी बिश्नोईला वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे. आता लॉरेन्स बिश्नोई या ऑफरला कसा प्रतिसाद देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Lawrence Bishnoi
हेही वाचा :
सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात जाण्याची शक्यता!
सलमान खानला मारण्याचा कट उघड ;धक्कादायक माहिती समोर
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावीच्या परीक्षेत मोठा बदल
पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला भीषण आग
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान
देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती