Thursday, February 20, 2025

आयपीएल २०२२ चा लिलाव सुरू असताना अचानक ऑक्शनर ह्युज एडमेड्स कोसळले

Photo : Twitter

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी ऑक्शन सुरू असताना एक अनपेक्षित घटना घडली आहे. आयपीएल २०२२ चा लिलाव सुरू असताना अचानक ऑक्शनर ह्युज एडमेड्स कोसळले.

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याच्यावर बोली लावली जात असताना ही लिलाव प्रक्रिया पार पाडणारे ह्यूज एडमीड्स बेशुद्ध होऊन पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे एकच धावपळ उडाली. या घटनेनंतर काही वेळासाठी लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली. या घटनेनंतर लिलाव प्रक्रियेत भोजनाचा अवकाश घोषित करण्यात आला. 

दरम्यान, रक्तातील साखर कमी झाल्याने ह्युज यांना भोवळ आली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता ह्युज व्यवस्थित असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles