Sunday, May 19, 2024
Homeराजकारणपश्चिम बंगाल निवडणूका : किंगमेकर बनण्याची काँग्रेस - डाव्या आघाडीला आशा

पश्चिम बंगाल निवडणूका : किंगमेकर बनण्याची काँग्रेस – डाव्या आघाडीला आशा

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय शर्यती रंगल्या असून तृणमूल काँग्रेस आणि भाजप अशी दुरंगी चित्र निर्माण झाली आहे. तर पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्याच्या राजकीय शर्यतीत काँग्रेस आणि डाव्या आघाडी मागे पडल्याचे चित्र आहे. मात्र कोणालाही बहुमत नसणारी त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास काँग्रेस – डाव्या आघाडीला किंगमेकर बनण्याची आशा निर्माण झाली आहे.

बंगालच्या सत्तेसाठी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत होणार असल्याचे विश्लेषण केले जात आहे. तसे असले तरी काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या हातमिळवणीने त्या राज्यात तिसरी राजकीय शक्ती उभी राहिली आहे. त्या पक्षांनी इंडियन सेक्युलर फ्रंटला (आयएसएफ) बरोबर घेऊन संयुक्त मोर्चाची स्थापना केली आहे. त्यामुळे बंगालच्या सत्तेसाठी सुरूवातीला दुरंगी वाटणाऱ्या लढतीला काहीसे स्वरूप प्राप्त झाले आहे.

काँग्रेस आणि डावे पक्ष बंगालमध्ये स्वत:चे राजकीय अस्तित्व ठळक करण्यासाठी काही वर्षांपासून झगडत आहेत. एकत्र येण्याने त्यांची ताकद दुर्लक्षित करता येणार नसल्याचे मानले जात आहे. डाव्यांची ऐतिहासिक ब्रिगेड मैदान येथे शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली होती.

त्रिशंकू स्थिती झाल्यास संयुक्त मोर्चाचे महत्त्व वाढणार !

बंगालमध्ये कुठल्याच राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यास संयुक्त मोर्चाचे महत्व वाढणार आहे. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास कुणाच्या हाती सत्ता सोपवायची याचा निर्णय त्या आघाडीवर अवलंबून राहील. काँग्रेसमधील सुत्रांकडून तर आतापासूनच महाराष्ट्र मॉडेलच्या पुनरावृत्तीचे भाकीत केले जात आहे. 

ममता – डावे एकत्र येतील का?

त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास तृणमूल काँग्रेस – डावे एकत्र येण्याबद्दल अजूनही जाहीर बोलले जात नाही. परंतु परंपरागत राजकीय विरोध असलेल्या ममता बॅनर्जी आणि डावे एकत्र येतील का ? हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

बंगालमध्येही महाराष्ट्र मॉडेल ?

 

काँग्रेसमधील सुत्रांमधून बंगालमध्येही “महाराष्ट्र मॉडेल” च्या पुनरावृत्तीचे भाकित केले जात आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि डावे एकत्र येण्याची शक्यता नाकरता येत नाही.

भाजप वगळता इतर पक्षांच्या नेत्यांना ममता बॅनर्जी यांचे पत्र

देशातील भाजप आणि मित्रपक्ष वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहित भाजपाच्या लोकशाही विरोधी धोरणाच्या विरोधात एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय