Sunday, December 8, 2024
HomeNews"हम तुम्हारे साथ है", पिंपरीत शिवसेनेची जोरदार निदर्शने

“हम तुम्हारे साथ है”, पिंपरीत शिवसेनेची जोरदार निदर्शने

पिंपरी चिंचवड : शहर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पिंपरी येथे जोरदार निदर्शने केली. गद्दार आमदारांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.

शिवसेनेच्या गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांचा निषेध करण्यासाठी शहरातील शिवसैनिकांकडून पिंपरी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या या आंदोलनात शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, महिला संघटिका उर्मिला काळभोर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, सचिन सानप, सरिता साने, अनिता तुतारे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय