Friday, May 17, 2024
HomeNewsमोठी बातमी : शिवसेनेच्या ‘या’ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी

मोठी बातमी : शिवसेनेच्या ‘या’ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना आमदारांच्या या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारही धोक्यात आलं आहे. अशात आता शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहण्याचे व्हिप काढले होते. परंतू ते बैठकीला उपस्थित न राहिल्याने बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. विधानसभेच्या विधीमंडळ बैठकीस गैरहजर राहणाऱ्या बारा आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे पत्र शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे. तसेच उर्वरित आमदार आमच्या सोबत असल्याचा दावाही अजय चौधरी यांनी केली आहे.

या आमदारांमध्ये

  • एकनाथ शिंदे
  • तानाजी सावंत
  • प्रकाश सुर्वे
  • बालाजी किणीकर
  • अनिल बाबर
  • लता सोनावणे
  • यामिनी जाधव
  • संजय शिरसाट
  • भरत गोगावले
  • संदीपान भुमरे
  • अब्दुल सत्तार
  • महेश शिंदे

या बारा आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय