Friday, November 22, 2024
Homeराज्यराज्यातील 'या' भागाला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा !

राज्यातील ‘या’ भागाला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा !

मुंबई : राज्यातील विविध भागाला भारतीय हवामान विभागाकडून तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा वर्तविण्यात आला आहे.

राज्यात 15 मार्चला मुंबई, ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा तर 16 मार्च संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काळजी घ्या, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

खुशखबर ! कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर

मागील दोन दिवसांपूर्वी देखील कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता‌.

तसेच सौराष्ट्र-कच्छ आणि कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट आणि किनारपट्टीवरील कर्नाटक, नैऋत्य राजस्थान आणि गुजरात प्रदेशात उष्णतेची लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात पुन्हा एल्गार, 11 ते 17 एप्रिल दरम्यान देशभरात आंदोलनाची घोषणा

राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती, विधानसभेत घोषणा

 

संबंधित लेख

लोकप्रिय