Tuesday, January 21, 2025

डॉ.प्रवीण मस्तुद यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान

बार्शी : डॉ. प्रविण मच्छिंद मस्तुद यांच्या ‘मूल्ये व मराठी भाषिक वृत्तपत्रीय व्यंगचित्रे’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून नवलेखक अनुदान योजनेतून अनुदान दिले जाणार असल्याचे पत्र शासनाकडून डॉ. प्रविण मस्तुद यांना प्राप्त झाले आहे.

अधिक माहिती अशी की, 2020 मध्ये मंडळाने जाहिराती द्वारे  प्रस्तावाला मागवले होते, त्यास मार्च 2022 मध्ये  मंडळाने अनुदान जाहीर केले आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळ ही साहित्य क्षेत्रातील राज्य शासनाची सर्वोच्च संस्था मानली जाते. राज्यभरातून मागवलेल्या साहित्य कृती मधून वेगवेगळ्या साहित्य प्रकारापैकी ‘वैचारिक साहित्य प्रकारातून’ डॉ. प्रविण मस्तुद यांच्या पुस्तकाची निवड मंडळाने केली आहे. मंडळ उच्च दर्जाचे साहित्य निवडते व त्यास अनुदान देते. साहित्य संस्कृती मंडळाने राज्यभरातून 11 लेखकांच्या पुस्तकांना अनुदान जाहीर केले, त्यामध्ये एक व सोलापूर जिल्ह्यातून एकमेव डॉ. प्रविण मस्तुद यांची वैचारिक साहित्य कृती आहेत.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन नागपुरात होणार !

डॉ. प्रविण मस्तुद हे झाडबुके महाविद्यालयात शिक्षकेतर पदावर काम करीत आहेत. ते कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक व लेखक आहेत, त्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतूक होत आहे.

त्यांच्या या यशाबद्दल बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्षाताई झाडबुके, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे, आई सुरेखा मस्तुद, शिक्षक – शिक्षकेतर, चळवळीतील कार्यकर्ते, मित्र यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, येथे विविध पदांची भरती

खुशखबर ! कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर


शेतकऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात पुन्हा एल्गार, 11 ते 17 एप्रिल दरम्यान देशभरात आंदोलनाची घोषणा

Related Articles

- Advertisement -

Latest Articles