Vinesh Phogat Disqualified : पेरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट यांना अंतिम सामन्याच्या अगोदर वजन अधिक असल्यामुळे स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. विनेश यांचे वजन ठरलेल्या मर्यादेपेक्षा काही ग्राम अधिक असल्याचे आढळून आले. या घटनेनंतर विविध राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लोकसभा मध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटच्या संघर्षाची प्रशंसा करत एक भावनिक संदेश लिहिला आहे. राहुल गांधी म्हणाले, “एकाच दिवशी जगातील तीन दिग्गज कुस्तीपटूंना पराभूत केल्यानंतर, आज विनेशसोबत संपूर्ण देश भावुक झाला आहे. ज्यांनी विनेश आणि तिच्या साथीदारांच्या संघर्षाला नाकारले, त्यांच्या नीयत आणि काबिलियतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यांना आता उत्तर मिळाले आहे.”
राहुल गांधी पुढे म्हणाले, आज भारताच्या या शूर बेटीसमोर तो संपूर्ण सत्ता तंत्र जमीनदोस्त झाला होता, ज्याने तिला अश्रूंचे कडू घोट पाजले होते. चॅम्पियन्सची खरी ओळख हीच असते की ते आपले उत्तर मैदानातच देतात. विनेश, तुला खूप शुभेच्छा. पॅरिसमध्ये तुझ्या यशाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करत ट्वीट केले आहे, “विनेश फोगाटच्या फाइनलमध्ये न खेळण्याच्या चर्चेतील तांत्रिक कारणांची गहन तपासणी होऊन सत्य समोर आणावे, आणि यामागील खरे कारण काय आहे, हे निश्चित करावे.” असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. (Vinesh Phogat)
काँग्रेस नेते शशि थरूर यांनी देखील या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी विनेशच्या कामगिरीचे कौतुक करत म्हटले, विनेशची कामगिरी अत्यंत प्रशंसनीय होती. तिने धैर्य, सामर्थ्य आणि प्रचंड समर्पण दाखवले. माझ्या मते, तिने आपले हृदय जिंकले आहे. तांत्रिक कारणांमुळे तिला अपात्र ठरविण्यात आले याबद्दल मी अत्यंत निराश आहे. थरूर पुढे म्हणाले, “मला हे कसे घडले हे समजत नाही. माझ्यासाठी सर्वात दुःखदायक गोष्ट म्हणजे तिच्या मेहनतीचे तिला योग्य फळ मिळाले नाही, ज्या ती खरोखरच पात्र होती.
हेही वाचा :
विनेश फोगाटच्या अपात्रतेवर राहुल गांधी यांचे ट्वीट
ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय
विनेश फोगाटच्या अपात्रतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले वाचा !
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल
शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद
सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद
दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन