Sunday, May 12, 2024
Homeआरोग्यकोरोनाआ. विनायकराव मेटे यांच्या मागणीला जिल्हाधिकारी यांची साद

आ. विनायकराव मेटे यांच्या मागणीला जिल्हाधिकारी यांची साद


मंगळवार पासून लॉकडाऊन मध्ये सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सूट

मुंबई : बीड मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव सूट देण्याबाबत घोषणा केली असून, आ.विनायक मेटे यांच्या मागणीनुसार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत लॉकडाऊन शिथिल करण्यासह सर्व प्रकारच्या व्यापारास परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत. 

बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असून, या लॉकडाऊनच्या वेळांमध्ये शिथीलता देण्याबाबत विविध व्यापारी संघटना, व्यावसायिक, तसेच काही पत्रकारांनी मागणी केली होती. 

जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच विविध व्यापारी संघटानांनी विविध मार्गांनी जिल्हाधिकारी यांचे कडे लॉकडाऊन मध्ये शिथिलता देऊन व्यावसायिकांना वेळ वाढवून देणेबाबत मागणी केली होती. लॉकडाऊन च्या काळात अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व हातावर रोजगार असणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आ. विनायक मेटे यांनी दि. २७ रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सर्व व्यापाराला परवानगी देण्याची मागणी केली होती.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय