Tuesday, May 7, 2024
Homeआंतरराष्ट्रीयविधवा प्रथा बंदी साठी लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर चा...

विधवा प्रथा बंदी साठी लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर चा पुढाकार !

कोल्हापूर : महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव एकमताने मंजूर करून देशा समोर एक नवा आदर्श घातला आहे. त्या आदेशाचे अनुकरण महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने करावे या करता थेट राज्यशासनाने सूचना केल्या आहेत. तसे करण्याचे आदेश सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत .या उपक्रमा अंतर्गत कोल्हापूरच्या लोकराजा शाहू महाराज संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राने महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतींमध्ये जाऊन त्यांना आपल्या गावामध्ये विधवा प्रथा बंदी करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी अभियान राबवले आहे.

या अभियानाअंतर्गत गाव पातळीवर समतेचा व विधवा सन्मानाचा विचार केला जाणार आहे. यंदाचे वर्ष लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचे स्मृति शताब्दी वर्ष आहे . शाहू महाराजांनी समाजातील विविध पातळीवरची विषमता नष्ट करून समता प्रस्थापित होण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय आणि कायदे केले होते.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय यांनी मिळून संविधान निर्माण केले. त्यामध्ये प्रत्येक नागरिकास समतेचा हक्क मिळवून दिला आहे त्यानुसार कोणीही व्यक्ती इतर कोणत्याही व्यक्ती पेक्षा कमी दर्जाची नाही. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या प्रथा परंपरांचा त्याग करणे हे नागरिकांचे कर्तव्य म्हणून आपण स्वीकारले आहे.

असे असतानाही स्त्री जेव्हा विधवा होते तेव्हा तिला अनेक सामाजिक ,धार्मिक अशा कार्यक्रमांमध्ये दुय्यम स्थान मानले जाते .हे तिचा सन्मान कमी करणारे तिला अपमानित करणारे कृत्य आहे .या प्रथेचे समाजातून समूळ उच्चाटन झाले पाहिजे . कोणत्याही स्त्रीला इतर स्त्री किंवा पुरुष आहे इतके सन्मानाने जगता आले पाहिजे. असा व्यापक दृष्टिकोन या अभियानांतर्गत राबवला जाणार आहे. 26 जून 2022( शाहू जयंती) पर्यंत 100 ग्रामपंचायती मध्ये हा ठराव संमत केला जावा यासाठी प्रशिक्षण केंद्राचे सर्व संविधान संवादक सक्रिय झाले आहेत.

प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष सुभाष वारे ,उपाध्यक्ष एडवोकेट असीम सरोदे ,कार्याध्यक्ष सुनील स्वामी तसेच राजवैभव शोभा रामचंद्र यांनी या उपक्रमास सुरुवात केली असून आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उस्फुर्तपणे काम सुरू केले आहे.

हेरवाड गावचा नवा आदर्श ; महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद ,शासन निर्णयाचे सर्वत्र स्वागत !

हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना अनिसचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर

देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार, भाजपच्या जोर-बैठका सुरू !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय