Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीपुण्यात परिवर्तनवादी आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न !

पुण्यात परिवर्तनवादी आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न !

आळंदी :  पुणे येथे काल (23 मे) आंतरजातीय प्रेमविवाह संपन्न झाला. गुरु पवार या मराठा समाजातील मुलाने वैशाली धोत्रे या वडार (NT) समाजातील मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला.

यावेळी परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्राचे संचालक सचिन गोडांबे हेही साक्षीदार म्हणून उपस्थित होते. तसेच अमोल रोहिणी कदम, कविता धोत्रे व इतर मित्र ही उपस्थित होते.

सचिन गोडांबे यांनी सांगितले की अश्या आंतरजातीय विवाहांमुळेच मनातून जातीव्यवस्था संपण्यास मदत होणार आहे ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला कायदेशीर पद्धतीने जातीव्यवस्था समाजातून हद्दपार करता येईल कारण त्यासाठी आंतरजातीय विवाह हाच सर्वांत मोठा मार्ग आहे, इतर सर्व मार्ग केवळ पूरक आहेत.

नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

त्यांनी आवाहन केले आहे की समाजातील ज्यांना कोणाला आंतरजातीय विवाह करण्याची इच्छा असल्यास आपण परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्र पुणे येथे संपर्क करू शकता. संपर्कासाठी 8600929360 या नंबरवर संपर्क साधावा.

राज्य सरकारची रू. 50 हजारांची तसेच तत्कालीन केंद्र सरकारने 2013 ला लागू केलेल्या योजनेनुसार रू. अडीच लाख इतकी आर्थिक मदत अश्या प्रकारच्या आंतरजातीय विवाहितांना मिळवून देण्यासाठी ही परिवर्तन विवाह केंद्र मदत करते.

राज्यात या कारणामुळे मॉन्सून लांबणीवर पडणार !

राखी सावंत ने गुपचूप उरकली इंगेजमेंट ; कोण आहे तिचा बॉयफ्रेंड ?

विधवा प्रथा बंदी साठी लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर चा पुढाकार !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय