Thursday, November 21, 2024
Homeपर्यटनव्हिडीओ : केरळ मधील वडक्कुमनाथन महाउत्सवातील विलोभनीय दृश्य

व्हिडीओ : केरळ मधील वडक्कुमनाथन महाउत्सवातील विलोभनीय दृश्य

केरळ /जलील बाबू : त्रिचुर जिल्ह्य़ात सुप्रसिद्ध वडक्कुमनाथन येथे प्राचीन शिव मंदिर आहे. येथे दरवर्षी एप्रिल महिन्यात त्रिशूरपूरम् या नावाने महाउत्सव साजरा केला जातो. १०१ हत्तींची सलामी सलामी देऊन बहुरंगी आतषबाजीने संपूर्ण त्रिशूरपुरममध्ये हत्तींची मिरवणूक काढली जाते. या प्रसंगी भाविकांमध्ये मोठा उत्साह असतो. त्रिशूरपूरम उत्सवाची सुरवात २०० वर्षांपूर्वी राजा शाकथन थमपुरन यांनी केली. १७९० ते १८०५ पर्यंत कोचीन राज्याचा तो शासक होता. लाखो लोकांच्या उपस्थितीत जगभरातील पर्यटक या उत्सवामध्ये सामील होतात.



विश्व प्रसिद्ध त्रिशूर पूरम, केरळचा सर्वात लोकप्रिय उत्सव, धूमधाम आणि देखावा यांचे मिश्रण आहे. विभिन्न सामाजिक स्थितिमधील हजारों लोक त्रिशूरच्या थेक्किन्कडु मैदानममधे एकत्र होऊन पूरम अथवा उत्सव साजरा करतात. हा उत्सव केरळचे प्राचीन स्थापत्य असलेल्या वडक्कुमनाथ मन्दिराच्या प्रांगणात आयोजित करतात.



या उत्सवात अन्य आयोजनांशिवाय 101 सुसज्जित हत्तींची भव्य सौंदर्य स्पर्धा आणि चमकते तारेजड़ित छत्र्यांचे तेज लयबद्ध परिवर्तनाबरोबर होणारी प्रतियोगिता कुडमट्टम ह्याचे मुख्य आकर्षण आहे. संगीतकारांतर्फ़े प्रस्तुत चेन्दमेलम आणि पंचवाद्यम प्रस्तुति दृष्टिसुखाबरोबर उपयुक्त संगत प्रदान करतात. दोन दिवस चालणार्‍या ह्या उत्कृष्ट मनोरंजनाच्या ग्रांड फिनालेच्या रूपात चित्ताकर्षित आतिशबाजीने आकाश झगमगून उठते.



संबंधित लेख

लोकप्रिय