Monday, May 20, 2024
Homeशिक्षणविद्याभारती प्राथमिक विभागात विजय दिन उत्साहात संपन्न

विद्याभारती प्राथमिक विभागात विजय दिन उत्साहात संपन्न

दापोली : सध्या आपल्या देशाचा  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष चालू आहे त्या निमित्ताने आज गुरुवार १६ डिसेंबर देशाचा ५०वा विजय दिन या दिनाचे औचित्य साधून दापोली एज्युकेशन सोसायटीच्या विद्याभारती विभागात स्वातंत्र्यवीर क्रांतीकारकांच्या जीवनावर आधारीत कीर्तन सेवा हा उपक्रम घेण्यात आला.

विद्याभारती शिशुवाटीका विभागप्रमुख ह. भ.प. भाग्यश्री बिबलकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर व क्रांतीकारक अनंत कान्हेरे यांच्याविषयीच्या लघुकथा आपल्या ओघवत्या भाषाशैलीद्वारे विद्यार्थ्यासमोर मांडल्या. यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला.

सदर प्रसंगी तबला साथ सौरभ घांगुर्डे व हार्मोनिअम उदय घांगुर्डे तर ढोलकीची साथ शाळेतील विद्यार्थी सार्थक शिगवण यांची लाभली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्याभारती विभागातील सर्व शिक्षकवृंद व ताई वर्गाने अपार मेहनत घेतली. या कार्यक्रमास सर्वमान्यवर संस्थाचालकांनी शुभेच्छा दिल्या.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय