Monday, February 17, 2025

जुन्नर : चोरी करण्यासाठी आलेल्या चोरास पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

पिंपळवंडी : कांदळी ( ता. जुन्नर)  येथे चोरी करण्यासाठी आलेल्या संतोष एकनाथ बर्डे ( वय २८ वर्ष राहणार अकलापूर ता. संगमनेर जि. अहमदनगर ) यास ग्रामस्थांनी पकडून नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यास अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी ( दि. १५ ) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत नारायणगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुभाष दामू घाडगे यांचा 

कांदळी मधील सुतारठिके या ठिकाणी बंगला असून सुभाष दामू घाडगे हे सध्या मुंबई या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांचा बंगला बंद असतो, या बंगल्यात श्रीकांत घाडगे हे रात्री झोपण्यास जात असतात. रात्री ते उशिरा झोपण्यासाठी गेले असता त्यांना बंगल्यात कुणीतरी असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळचे सहकारी मेजर सुशांत घाडगे जयेश घाडगे व अनिकेत फापाळे यांना फोन करुन बोलविले. 

त्यावेळी बंगल्याच्या छतावर असलेला संतोष बर्डे याने त्याच्या हातामधील साहित्य खाली टाकले. त्यावेळी सर्वजण बाजूला झाले तीच संधी साधून संतोष बर्डे याने छतावरून खाली ऊडी टाकली. त्या दरम्यान मेजर सुशांत घाडगे यांनी प्रसंगसावधानता दाखवत संतोष बर्डे यास पकडले. त्यानंतर त्यांनी त्यास नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी संतोष एकनाथ बर्डे याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पी. डी. मोहरे करत आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles