VBA and Manoj Jarange : आगामी लोकसभेच्या निवडणूकीसाठी राजकीय पक्षांंची जोरदार तयारी सूरू असून जागा वाटपाबाबत महत्वाच्या बैठका देखील होत आहे. महाविकास आघाडीची देखील लोकसभेच्या जागा वाटपाबाबत बुधवारी महत्वाची बैठक पार पडली. मविआच्या बैठकीत वंचितच्या 4 मोठ्या मागण्या केल्या आहे.
वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडे 4 मोठ्या मागण्या केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्राद्वारे या 4 मागण्या केल्या आहेत.
यामध्ये 1. मविआचे सामाईक उमेदवार म्हणून जालन्यातून मनोज जरांगे पाटील आणि पुण्यातून डॉ. अभिजित वैद्य यांना पाठिंबा द्यावा. 2. 15 ओबीसी उमेदवार असावेत. 3. धार्मिक अल्पसंख्याकांतून किमान 3 उमेदवार लोकसभेसाठी द्यावेत. 4. मविआतील प्रत्येक घटक पक्षाकडून लेखी वचन घ्यावे की, त्यांचा पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
महाविकास आघाडीने आम्हाला बैठकीत कळवले की, त्यांच्यात अंतर्गत चर्चा होईल आणि लवकरच मविआ आणि वंचित दोघेही भाजप-आरएसएसला पाडण्यासाठी जागा वाटपासंदर्भात पुन्हा बसून चर्चा करतील. असेही वंचितकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
ब्रेकिंग : ट्रेनची मोठी दुर्घटना, अनेक लोकांना ट्रेनने चेंगरले
Nilesh Rane : निलेश राणे यांच्यावर पुणे महापालिकेची मोठी कारवाई
ब्रेकिंग: निवेदनावर मुख्यमंत्री शिंदेंची खोटी सही, शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार
धक्कादायक : शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
ब्रेकिंग : हजारो आदिवासींचे आंदोलन; रस्त्यावरच पेटवल्या चूली
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर ?