Wednesday, May 8, 2024
Homeताज्या बातम्याJamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, १२ जणांना चेंगरले

Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, १२ जणांना चेंगरले

Jamtara Train Accident : झारखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. झारखंडमधील जामतारा जिल्ह्यात रेल्वेची १२ जणांना धडक बसली असून दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. आरपीएफ आणि स्थानिक पोलिस दलाच्या पथकाने स्थानिक लोकांच्या मदतीने दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Jamtara Train Accident, 12 people were crushed by the train

स्थानिक वृत्तांच्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये आग लागली होती. आगीची माहिती समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. प्रवाशांनी ट्रेनमधून चुकीच्या बाजूने उड्या मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, अचानक आसनसोलहून जसिडीहच्या दिशेने जाणारी ईएमयू पॅसेंजर ट्रेन आल्याने या ट्रेनची १२ जणांना धडक बसली यात दोन जणांचा मृत्यू झाला. मात्र याला रेल्वे प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यासागर कासितार दरम्यान जाणारी ट्रेन क्रमांक १२२५४ सात वाजता ईआरच्या आसनसोल विभागात थांबली. दोन जण रुळावरून चालत असताना त्यांना अप मार्गावर मेमू ट्रेनची धडक बसली. जे मृत झाले ते प्रवासी नव्हते, ते रुळावरून चालत होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जेएजीची तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच आग लागल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने पूर्णपणे नाकारली आहे.

जामतारा उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) मुजीबुर रहमान यांनी पीटीआयला सांगितले की, हा अपघात जामतारा जिल्ह्यातील कलझारिया भागाजवळ झाला. रहमान म्हणाले, “आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. “शोध ऑपरेशन चालू आहे आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अपघातात जीव गमावलेल्या दोघांच्याही मृतदेहांची ओळख पटली आहे. जामतारा आरपीएफ टीम ॲम्ब्युलन्सच्या मदतीने दोन्ही मृतदेह जामतारा येथे नेण्यात आले, तर जखमींना रेल्वेने आसनसोलला पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा :

Nilesh Rane : निलेश राणे यांच्यावर पुणे महापालिकेची मोठी कारवाई

ब्रेकिंग: निवेदनावर मुख्यमंत्री शिंदेंची खोटी सही, शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार

धक्कादायक : शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

ब्रेकिंग : हजारो आदिवासींचे आंदोलन; रस्त्यावरच पेटवल्या चूली

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय