पुणे : पुण्यातील लाल महालामध्ये लावणीची रिल्स केल्यामुळे शिवप्रेमींनी मोठा संताप व्यक्त केला होता. या प्रकरणी आता फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी राकेश विनोद सोनवणे यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी लाल महालात आरोपी वैष्णवी पाटील व तीच्या सोबत असलेली एक स्त्री व दोन पुरुष असे लाल महाल येथे येऊन लाल महालाच्या आतील मोकळ्या जागेत वैष्णवी पाटील हिने लावणी नृत्य केले. तिच्यासोबत असलेल्या पुरुषांपैकी दोन पुरुषांनी त्याचे मोबाईलमध्ये शुटींग करून त्याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला.
या सगळ्या प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये माफी मागत वैष्णवीने म्हणाली, ‘पुण्याच्या लाल महालात व्हिडीओ शूट करताना माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते. गाणं सुंदर असल्याने त्यावर व्हिडीओ करावा असे माझ्या मनात आले. त्यामुळे मी त्यावर मी व्हिडीओ शूट केला. लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागतें.’ असा व्हिडीओ वैष्णवीने पोस्ट करत माफी मागितली आहे.
गूगल ने गामा पैलवानांना वाहिली अनोखी आदरांजली !
सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ; निवृत्तीचे वय व पेन्शनची रक्कम वाढणार !
विशेष लेख : जागतिक जैव विविधता दिवस !