Sunday, May 12, 2024
Homeराज्यवैभव सोनोनेला ब्रिटनच्या तीन विद्यापीठाकडून दीड कोटींच्या शिष्यवृत्ती मंजूर, बांधकाम मजूराच्या लेकाचं...

वैभव सोनोनेला ब्रिटनच्या तीन विद्यापीठाकडून दीड कोटींच्या शिष्यवृत्ती मंजूर, बांधकाम मजूराच्या लेकाचं वैभव

वाशीम : गरीबी आणि घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत रिसोड तालुक्यातील पेडगाव येथील वैभव सोनोने कष्टाच चीज केलं आहे. गरीब कुटुंबातील वैभव आता पुढील शिक्षणासाठी थेट ब्रिटनला जातो आहे, यासाठी वैभवने नामांकित तीन वेगवेगळया विद्यापीठाकडून जवळपास दीड कोटींच्या शिष्यवृत्ती मिळविल्या आहेत. वैभव विमल गणेश सोनोने असे या तरुणाचं नाव आहे.

पुण्यात बांधकाम मजूर म्हणून केलेले विमल गणेश सोनोने दांपत्य. घरची हलाखीची परिस्थिती, एकेकाळी जेवणाचीही सोय होत नव्हती. मात्र, सोनोने कुटुंबावर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव असल्याने एक वेळ घरात खायलाही काही नसले तरी चालेल. मात्र, मुलांच्या अभ्यासासाठी पुस्तकं कमी पडू द्यायची नाहीत, हेच वैभवच्या आई वडिलांचे ध्येय. अत्यंत बिकट परिस्थितीत वैभवने अभ्यास करून आता मोठे वैभव मिळवलं आहे.

वैभव सोनोनेला चिवनिंग अवॉर्ड ही शिष्यवृत्ती युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये पर्यावरण व विकास याविषयी अभ्यासासाठी तर कॉमनवेल्थ शेयर्ड कॉलरशिप युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स मध्येच अभ्यासासाठी आणि कॉमनवेल्थ शेयर्ड कॉलरशिप युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंजिला यामध्ये शेती आणि ग्रामीण विकास याविषयी अभ्यासासाठी मंजूर झाली आहे. त्यामुळे तो आता लवकरच उच्चशिक्षणासाठी ब्रिटनला जाणार आहे.

वैभवचं प्राथमिक शिक्षण पेडगाव या गावातच झाले. लोणी येथील संत सखाराम महाराज आश्रम शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पोहचला. तिथे त्याने राज्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेतले. त्यानंतर बैंगलोर येथे एम.ए. डेव्हलपमेंट या विषयावर शिक्षण पूर्ण केले आहे.

शिष्यवृत्तीच्या माहितीसाठी राजु केंद्रे यांची मदत

वैभवला शिक्षणात प्रचंड आवड. पण घरच्या गरिबीमुळे त्याला शिक्षणसाठी मोठा संघर्ष करावा लागला. वैभवची शिक्षणाची धडपड बघून राजु केंद्रे यांनी त्याला विदेशातील शिष्यवृत्तीविषयी माहिती दिली. राजु केंद्रे यांच्या वेळोवेळीच्या मागदर्शनामूळे वैभवने तयारी केली. यात अखेर त्याने यश मिळवलं.

वैभवची सोशल मीडिया पोस्ट

हा प्रवास सोप्पा नव्हता.. I am thrilled to announce that, I have been chosen for Chevening Award, a fully funded scholarship by UK Government (FCDO) for the 2023-24.
सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणात जिथे रोजच्या जगणंच एक लढाई मोठी असते अशा कुटुंबातुन फ़क्त शिक्षणाच्या जोरावर ब्रिटिश शासनाची महत्वाची आणि मानाची अशी चेवेनिंग स्कॉलरशिप मिळवणे सोप्पी गोष्ट नव्हती. पण बाबासाहेब म्हणतात तसं- शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्यायला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. माझ्या आई-वडिलांनी जे कष्ट केलेत त्याचे चीज झाल्याची भावना तर आज आहेच पण त्यापेक्षा मोठी भावना आहे की, या मोठ्या प्लॅटफार्मवरून सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक आणि सांस्कृतिक मागासेलेल्या, वंचित समुदायाचे प्रतिनिधित्व करत असतांना त्यांच्या न्याय आणि हक्काची भूमिका मांडता येइल.

नैसर्गिक साधन संपत्तीच्या असमान वाटपामुळे वंचित अजुनच मागे राहतात असे नवसागरे सर नेहमी म्हणायचे. त्यामुळे आजच्या भांडवलवादी व्यवस्थेत आमचं स्थान मागेच आहे. मागच्या ६-७ वर्षात गोंड आणि कोरकू या आदिवासी जमातींसोबत काम करून आणि भारत तसेच भारताबाहेरील आदिवासी आणि वंचित घटकांचा अभ्यास केल्यानंतर हि नैसर्गिक साधन संपत्तीच्या हक्काची लढाई मला महत्वाची वाटली आणि म्हणून मी ‘पर्यावरण व्यवस्थापन आणि विकास’ या विषयाच्या अनुषंगाने अभ्यासाचे क्षेत्र निवडले आहे. फ़क्त शिक्षण हेच वंचितांच भांडवल हि गोष्ट खरी आहे पण या भांडवली जगात आता आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज आहे आणि आपल्या हक्काची लढाई हर एक प्रकारे लढण्याची गरज आहे.

याच स्कॉलरशिपसाठी पार्टनर स्नेहल तनपुरे वेटिंग लिस्ट मध्ये आहे. पहिल्याच प्रयत्नात इथपर्यंत आम्ही पोहचलो आहोत. मागच्या १० महिन्यातील प्रवासाच सुंदर फळ मिळालं आहे.

माझी हि स्कॉलरशिप मी माझ्या धमनपानीच्या लोकांना, एकलव्य चळवळीला, माझ्या प्राध्यापिका डॉ. हरिणी नागेन्द्र, माझी पार्टनर स्नेहल आणि मित्र अभिषेक याला डेडीकेट करतो.

हे ही वाचा :

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक व अन्य पदांसाठी भरती

GMC धुळे येथे ‘लिपिक नि टंकलेखक’ पदासाठी भरती

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय