उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला आज सकाळी उड्डाणानंतर लगेचच इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याची माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टरला पक्षी धडकल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विकासकामांचा आढावा घेण्यासाठी वाराणसीत आले होते. त्यावेळी वाराणसीहून लखनऊला जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरवर अचानक पक्षी आदळला, त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून योगी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेनंतर हे हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले, त्यानंतर त्यांना सीएम योगींना पर्याय म्हणून दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, तांत्रिक पथकाकडून त्या हेलिकॉप्टरची कसून तपासणी केली जाते. सर्वकाही ठिक आहे याची खात्री झाल्यानंतरच हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची परवानगी दिली जाते.