Wednesday, November 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयUs strikes : अमेरिकेचे हुथी बंडखोरांवर मोठे हवाई हल्ले, भूमिगत बंकर्स उद्ध्वस्त...

Us strikes : अमेरिकेचे हुथी बंडखोरांवर मोठे हवाई हल्ले, भूमिगत बंकर्स उद्ध्वस्त (video)

येमेन : अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या B-2 बॉम्बर्स विमानांनी हुथी बंडखोरांवर मोठी लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेने येमेनमधील भूमिगत बंकर्सवर हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,अमेरिकन वायुसेनेच्या B-2 स्टेल्थ बॉम्बर्सने येमेन मध्ये दि. 17 रोजी येमेनच्या हूती गटाच्या ताब्यातील मोठ्या भागांवर प्रचंड मोठे क्षेपणास्त्र हल्ले करून हूती गटाचे पाच भूमिगत शस्त्र साठे नष्ट केले आहेत. (Us strikes)

हुथी बंडखोर हा येमेनमधील शिया अल्पसंख्याकांचा एक सशस्त्र गट आहे, अलीकडच्या काळात हुती बंडखोरांनी शंभर पेक्षा जास्त मालवाहू जहाजावर लाल समुद्रात क्षेपणास्त्र हल्ले करून मोठे नुकसान केले आहे. हुती बंडखोर गटास इराणचा पाठिंबा असून त्यांनी हमास समर्थनार्थ इस्रायल तसेच पाश्चिमात्य मालवाहू जहाजावर मोठे हल्ले केले होते. (Us strikes)

इकडे लेबोनन वर इस्रायलचे हल्ले सुरूच असून अमेरिकेच्या युद्ध नौका आणि B 2 अतिप्रगत विमाने आता मध्यपूर्वेतील तणावग्रस्त भागावर लक्ष ठेवून आहेत.

येत्या काही महिन्यात अमेरिका इस्रायल संयुक्तपणे इराण सह इराण समर्थित बंडखोर गटावर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय