Sunday, May 5, 2024
Homeहवामानपुढील ३-४ दिवसात अवकाळीचे संकट ; "या" भागात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील ३-४ दिवसात अवकाळीचे संकट ; “या” भागात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : बंगालच्या उपसागरावर बाष्पयुक्त वारे जमा झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सध्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. येत्या १२ जानेवारीपर्यंत राज्यात पावसाची अशीच स्थिती राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.ऐन रब्बी हंगामातील पिके जोमात असताना अवकाळीचं संकट तयार झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हवामान खात्याने पुढील २४ तासांत पावसाचा इशारा (Heavy Rain) दिला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पाठ सोडण्याची शक्यता कमीच आहे. बुधवारी १० जानेवारीला महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे तमिळनाडूच्या किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, राजस्थान, केरळ, पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व राजस्थान दक्षिण कर्नाटक, लक्षद्वीप या भागात मुसळधार पावसाचा (Rain Alert) इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय