Sunday, May 19, 2024
HomeNewsचाकण येथे एकाच दिवशी पाच कंपन्यांमध्ये युनियनची स्थापना

चाकण येथे एकाच दिवशी पाच कंपन्यांमध्ये युनियनची स्थापना

चाकण / क्रांतिकुमार कडुलकर : एकाच दिवसांमध्ये चाकण औद्योगिक वसाहतीतील पाच कंपनीतील शेकडो कामगारांनी ‘स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना’ या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आहे.

सिमंडस मार्शल – भांबोली, डेलोर्टो इंडिया प्रा.लि. भांबोली, राजकुमार फोर्ज – खराबवाडी, एन टी बी – आळंदी फाटा, ट्रॅक कंपोनंट लि. युनिट-४ निघोजे या ठिकाणी संघटनेच्या नामफलकाचे उदघाटन स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, सल्लागार रोहिदास गाडे पाटील, कामगार नेते किसनराव बावकर आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवनशेठ येळवंडे उपाध्यक्ष-शामभाऊ सुळके, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, संघटक तेजस बिरदवडे, दत्तात्रय येळवंडे, रवी भालेराव, प्रशांत पाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.



संघटनेच्या उद्घाटना निमित्ताने आमदार महेश लांडगे यांनी कामगार व व्यवस्थापन यांना मार्गदर्शन करत असताना म्हणाले की, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना ही नेहमी कंपनी आणि कामगारांच्या हिताचे निर्णय घेत असते. त्यामुळे सर्व कामगार बांधवांनी कंपनी आपली आहे. ही विचार भावना मनात ठेवून कंपनीसाठी काम करावे आणि व्यवस्थापनाने ही कामगारांवर अन्याय करू नये, कामगारांना सहकार्य करावे, आणि एकत्रितपणे एक विचाराने काम करून औद्योगिक विकास करावा.

तसेच संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनीही कामगार व व्यवस्थापन यांना मार्गदर्शन केले आणि संघटनेचे सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय