Sunday, May 5, 2024
Homeजुन्नरजुन्नर : शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जुन्नर : शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जुन्नर : आदिमाया शक्ती विद्यालय, इंगळूण येथे रोटरी क्लब ऑफ पुणे व स्प्लेंडीड व्हिजन एन. जी. ओ. यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यामध्ये एक सॅग, ४ वह्या १ पेन, एक रंगीत तेलखडू बॉक्स, शिसपेन्सील इ.शालोपयोगी साहित्यांचा समावेश होता. तसेच विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा हा उपक्रम विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संजयकुमार लांडे यांनी ऑगस्ट महिन्यात घेतला. त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



बक्षिसाचे स्वरूप प्रमाणपत्र, ट्रॉफी, स्टेनलेस स्टील जेवणाचा डब्बा व रायटिंग पॅड असे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप विरणक होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्प्लेंडीड व्हिजनचे प्रमुख सुनिल भालेराव व अतिष कापसे उपस्थित होते.

या बक्षिसांचे प्रायोजक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि मंत्रालय, मुंबई येथील सहाय्यक कक्षाधिकारी अशोक विरणक हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के. ढोबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेखनिसार इनामदार व संजयकुमार लांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू वामन यांनी केले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय