Home ताज्या बातम्या Udayanraje Bhosale : लोकसभेच्या तिकिटासाठी उदयनराजे दिल्लीत, तीन दिवसांपासून अमित शहांच्या भेटीच्या...

Udayanraje Bhosale : लोकसभेच्या तिकिटासाठी उदयनराजे दिल्लीत, तीन दिवसांपासून अमित शहांच्या भेटीच्या प्रतिक्षेत

Udayanraje Bhosale: Udayanraje in Delhi for Lok Sabha ticket, waiting for Amit Shah's visit for three days

Udayanraje Bhosale : सातारा लोकसभा जागेवरून (Satara Loksabha) महायुतीमध्ये तिढा कायम आहे. भाजप राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. यासाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे अमित शहा यांच्या भेटीला दिल्लीला गेले आहेत. मात्र त्यांची भेट होत नसल्याने ते तीन दिवसापासून राजधानी दिल्लीत ते तळ ठोकून आहेत.

सातारा लोकसभा मतदारवर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून दावा करण्यात आला आहे, तर त्याच जागेवरून लोकसभा लढण्यासाठी उदयनराजे इच्छुक आहेत. या जागेबाबत उदयनराजे केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकूनही असलेले उदयनराजे भोसले यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट न झाल्याने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपुर्वीच भाजपने आपल्या काही उमेदवारांची यादी जाहिर केली, मात्र यात सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न आल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचे बघायला मिळाले होते. त्यामुळे आता तीन दिवसांपासून दिल्लीत ताटकाळलेले उदयनराजे यांना उमेदवारी मिळणार की नाही? याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा :

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

मोठी बातमी : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली

ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

किल्ले शिवनेरीवर जाताय? वन विभागाने घेतलेला निर्णय आवश्यक वाचा!

ब्रेकिंग : बिहार कोसी नदीवरील मोठा पूल कोसळला, एक ठार,अनेक जखमी

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

Exit mobile version